Twitter : @milindmane70
मुंबई
रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (मजीपा) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनांची (Jal Jeevan Mission) आढावा बैठक घेवून कडक कारवाईची करण्याची तंबी दिल्यानंतर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसह बोगस ठेकेदारही ताळयावर आले आहेत. कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालु योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १,४२२ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चालू असलेल्या योजनांची कामे २०२४ पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आतापर्यंत 95 योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच रायगडमध्ये जलजीवनचे दहा टक्केही काम पूर्ण नाही आणि जिल्हा परिषद प्रशासन १४२२ पैकी ९५ योजना पूर्ण झाल्याचे कौतुक करीत असल्याची टीका अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या संगनमताने करोडोंची आर.ए. बिल उचलणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून केंद्र सरकारच्या “ईडी” कडे फसवणुकीबद्दल तक्रार दाखल करण्यात यावी, अशी मागणीच सावंत यांनी शासनाकडे केली होती.
या योजनेमधील अनागोंदी कारभाराबाबत सावंत यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने रा. जि. प. कडून अहवाल मागविला होता. याबाबत राजिपच्या पाणीपुरवठा विभागाने सावंत यांना ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जिल्हयाचा प्रगती अहवाल माहितीसाठी दिला आहे.
ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जलजिवन योजनेचा प्रगती अहवाल
तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना पुढील प्रमाणे
अलिबागमधील 8 योजना पूर्ण. यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 10, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 50 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 26.
कर्जत 6 योजना पूर्ण. यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 14, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 35, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 33 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 33.
महाड ४, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 48, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 31, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 41 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 16.
माणगाव 21, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 46, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 29 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 42.
म्हसळा 7, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 17, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10.
मुरूड 7, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 7, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 9, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 27.
खालापूर 0, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 49, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6.
पनवेल १, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 40, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 47, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 21 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10.
पेण 9, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 14, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 27 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 29.
पोलादपूर 13, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 4, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 36, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 20 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6.
रोहा 8, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 28, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 38 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 45.
श्रीवर्धन 14, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 13, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 7.
सुधागड १०, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 37, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 26 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6.
तळा 4, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 5, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 11, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 12 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 18.
उरण १, यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 12, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 5, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 2 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना अशा एकूण 113 योजना पूर्ण झाल्या आहेत.
“रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदार- पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी यांना रायगड जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात यावीत.”
संजय वेंगुर्लेकर
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा परिषद