महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dahisar Toll Naka : स्थानिकांच्या विरोधामुळे Dahisar नाका स्थलांतराचा निर्णय बारगळला..!

“AI” आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई — मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा आणि वाढत्या वायूप्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतराचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित टोल वसुली प्रणाली राबवण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्थलांतराला विरोध, पण उपाय ठरला ‘AI’

मंत्री सरनाईक म्हणाले, “दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ॲम्बुलन्स, शाळा बस आणि अत्यावश्यक सेवा यांना अडथळा निर्माण होतो, प्रदूषणात भर पडते आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर सरनाईक यांनी त्यांच्या भावनांचा आदर राखत “AI-आधारित टोल भरणा प्रणाली”चा पर्याय तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. “हा प्रस्ताव अमलात आल्यास सध्याचा टोल नाका कायमस्वरूपी बंद करता येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

“AI” आधारित स्वयंचलित टोल वसुली

सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “टोल वसुली अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात येईल. वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करणारे AI कॅमेरे स्वयंचलित टोल भरणा सुनिश्चित करतील. त्यामुळे टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगा इतिहासजमा होतील.”

तसेच, दोन टोलनाक्यांचा भरणा एका ठिकाणी एकत्र करण्याची संकल्पना अमलात आणल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल, असा दावाही त्यांनी केला.

बैठकीत बहुमुखी निर्णय

मंत्रालयात आयोजित बैठकीस मुंबई पोलिसांचे सहाय्यक आयुक्त अनिल कुंभारे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक अंशुमली श्रीवास्तव, MEP इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त न. कृ. वेंगुर्लेकर, मिरा-भाईंदर नगर अभियंता दीपक खांबित आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पेणकर पाडा फाटा सिग्नलवरील वाहतूक सुलभता, तसेच दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोल नाका या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

“रस्ते विकास व कायमस्वरूपी समाधानाची दिशा”

सरनाईक यांनी सांगितले की, “वाहतूक समस्येवर तात्पुरता नाही तर दीर्घकालीन आणि तांत्रिक उपाय हवा आहे. AI प्रणाली ही त्या दिशेने टाकलेली निर्णायक पाऊल ठरेल.”

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात