X: @therajkaran
महाराष्ट्रात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे.अशातच राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याअभावी पाणीपुरवठा अनेक छोटी मोठी धरणे कोरडी पडू लागली. सर्वसामान्य जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी याकडे कानाडोळा केल्याने याचे अतिशय गंभीर व थेट परिणाम प्रत्यक्ष मतदानावर दिसून येतील असा गंभीर इशारा एका नावाजलेल्या राजकीय नेत्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
आजच्या परिस्थितीत राज्यांत लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पाही अल्प टक्केवारी का असेना पार पडला. पण आश्चर्य एका गोष्टीचे वाटते ते म्हणजे राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्या अगोदरच राज्याच्या विशेषतः ग्रामीण भागात पिण्याच्या पाणी जनतेला अपुरे मिळत होते. मात्र आपल्या या जाणिवेची दखल आपला स्थानिक आमदार घेईल या आशेवर जनता विसंबून राहिली खरी, पण प्रत्यक्षात त्यांच्या हाती धतुराच आला. मात्र जसा एप्रिल सुरु झाला उन्हाच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केले आणि राज्यातील अस्तित्वात असलेल्या धरणातील पाण्यांनिही तळ गाठल्याने ग्रामीण भागातील जनता व काही प्रमाणात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या पट्ट्यातील सर्वसामान्य जनता पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करत असल्याचे काळीज पिळवटून टाकणारे व विदारक दृश्य राज्यात जागोजागी पाहायला मिळत आहेत. यात विशेषतः लहान मुले व महिला यांचे आपण बघू शकत नाही.
पण या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील जे अधिकृत पक्ष निवडणूक लढवत आहेत उदा. उध्दव ठाकरे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, वंचित बहुजन पार्टी आदी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण व काही प्रमाणात शहरीही उदा.संभाजीनगर,नाशिक,जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, धुळे, नंदुरबार,जालना, आदि संपूर्ण मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राच्या भीषण पाणी टंचाईकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने ते त्यांना प्रत्यक्ष मतदानावेळी जड जाऊ शकते अशीही एक शक्यता वर्तविण्यात येत आहे
मराठवाड्यात तीव्र टंचाई….! ज्या मराठवाड्यात जरांगे पाटील सारख्या सामान्य कार्यकर्त्याने मराठा समाजाला आरक्षणावरून राज्यभर, देशभर, अगदी जगभर दखल घेण्याजोगे रान उठवले त्याच जिल्ह्यात तीव्र उष्मा, वर प्रचंड जीवघेणी पाणीटंचाईचे महसंकट पण जरांगे पाटील यांच्यासाठी फक्तं मराठा आरक्षण हा जिवामरणाचा प्रश्न बनला आहे. पण जो नेता एका जातीला आरक्षण देण्यासाठी आंदोलन करतो तोच नेता तीव्र पाणीटंचाई विषयी काहीच बोलत नसल्याने आता मराठा समाज संओत की अन्य सर्वच समाजातील जनतेत तीव्र असंतोष पाहायला मिळतो.
पाणी उपलब्धतेच्या बाबतीत सर्वात चिंताजनक अवस्था मराठवाड्याची आहे. केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे २७ टक्के आणि नाशिक विभागात २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण, नागपूर आणि अमरावती विभागात ३४ ते ४२ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे.
कोयना, उजनी, जायकवाडीत कमी पाणी
२३ जिल्ह्यांमध्ये ६० ते ८० टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. दुष्काळ प्रवण ९ जिल्ह्यांमध्ये ६० ते ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस झाला होता. परिणामी, गेल्यावर्षी राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. कोयना, उजनी आणि जायकवाडीसारखी मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकलेली नाहीत.
राज्यात कोरडी पडलेली धरणे
कालिसरार, खडकपूर्णा, बोरगाव अंजनपूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, वांगदरी, ढालेगाव, गुंजारगा, किल्लारी, निम्न तेरणा, मदनसुरी, राजेगाव, सिना कोळेगाव, तागरखेडा, बिडगीहाळ, कारसा पोहरेगाव, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, निम्न दुधना, चणकापूर.
राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक भागात पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील प्रचारात मात्र राजकारण आणि राजकारणच दिसून येत आहे. पाण्यासारखा मूलभूत प्रश्न मात्र या सर्व प्रचारापासून बराच लांब राहिला आहे ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.