महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी दानवे, किरीट, भारती पवारांसह डझनभर नेते इच्छुक

X : @MilindMane70

मुंबई – महाराष्ट्रातील पियुष गोयल (Piyush Goyal) व उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हे राज्यसभेतील दोन खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने आणि देशभरातील अन्य राज्यातील ११ अशा राज्यसभेच्या (Rajya Sabha) एकूण रिक्त १३ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक (Bye-election of Rajya Sabha) होत आहे. महाराष्ट्रातील या दोन रिक्त जागी आपली निवड व्हावी यासाठी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) पराभूत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) डझनभर नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.

महाराष्ट्रातून लोकसभेत निवडून गेलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुदत २. ४.२०२६ पर्यंत होती, तर पीयूष गोयल यांची मुदत ४. ०७.२०२८ रोजी संपणार होती. याचाच अर्थ या पोटनिवडणुकीत जो उमेदवार निवडून येईल त्याला अनुक्रमे दोन आणि चार वर्षाचा कालावधी मिळणार आहे.

या दोन जागेसाठी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), भारती पवार (Bharati Pawar), डॉ सुभाष भामरे (Dr Subhash Bhamare) यांच्यासह नवनीत राणा, डॉ किरीट सोमय्या, शेतकरी कामगार पक्षातून भाजपात आलेले दक्षिण रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील मोहन पाटील या नेत्यानी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यातीलच कोणा एकाची वर्णी लागते की अनपेक्षितपणे एखाद्या नवीन व्यक्तीला संधी मिळते, हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.

दरम्यान, राज्यसभेवर निवडून द्यायच्या १२ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १४ ऑगस्ट रोजी या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, २२ ऑगस्ट रोजी अर्जांची छाननी होईल. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व त्रिपुरा या राज्यांसाठी २६ ऑगस्ट रोजी तर बिहार, हरियाणा, राजस्थान व तेलंगणा या राज्यांसाठी २७ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल तर ३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी चालू होईल.

कोणत्या राज्यातून किती जागा भरायच्या आहेत ? –

आसाममधून कामाख्या प्रसाद तासा व सरबानंद सोनोवाल या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. बिहारमधून मिशा भारती व विवेक ठाकूर या दोन जागा, हरियणामधून दिपेंदर सिंग हुड्डा, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्रातून छत्रपती उदयनराजे भोसले व पियुष वेद प्रकाश गोयल, राजस्थानमधून के सी वेणुगोपाल, त्रिपुरामधून बिप्लब कुमार देब, तेलंगणामधून डॉ के. केशवराव, तर ओडिसामधून ममता मोहन्ता या जागा रिक्त झाल्या आहेत.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात