ताज्या बातम्या महाराष्ट्र

ललित पाटीलला कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद होता ? : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांना शोध लागत नव्हता. अखेर ललित पाटील याला अटक करण्यात आली. या मुद्यावरून बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारवर टिकेची झोड उठवली.

वडेट्टीवार म्हणाले की, ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरणातील आरोपी पाटील पंधरा दिवसांनी सापडला. पण असे अनेक “ललित”अजूनही मोकाट आहेत.

ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य काय आहे? हे राज्यातील जनतेच्या समोर यायला हवे. ललित पाटीलला तुरुंगात टाकून सर्व प्रकरण मिटले हा आव सरकारने आणू नये. कारण आरोपीला पळायला कोणी मदत केली होती ? महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद पाटीलला होता? रुग्णालयातून ड्रग पुरवण्याचे धंदे कसे सुरू होते? ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राज्यात कुठपर्यंत पोहोचले आहेत, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशीही मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी यावेळी सरकारकडे केली.

ड्रगचा धंदा हे महाराष्ट्राचे दुर्दैव

वडेट्टीवार म्हणाले, ललीत पाटील धुळे, चाळीसगाव फिरून कर्नाटकमध्ये (Karnataka) गेला. त्यानंतर चेन्नई येथे त्याला मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) अटक केली. त्यामुळे पुणे पोलीस काय करत होते हा प्रश्न आहे. ललित पाटीलला पकडले म्हणजे प्रकरण मिटले, असे होत नाही. त्याला कोणाची फूस होती, त्याला कोणी पळवले याचीही चौकशी झालीच पाहिजे. एकीकडे रूग्णालयात ड्रगचा धंदा केला जातो. दुसरीकडे रूग्णांना औषध मिळत नाही. हे सरकारचे अपयश आहे.सरकारी दवाखान्यात ड्रगचा धंदा होतो, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून पुण्याच्या ससून रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य जनतेसमोर आले पाहिजे.

सरकार फक्त टेंडर (Tender sarkar) काढण्यात व्यस्त असून सरकारला मलिदा खाण्याशिवाय उद्योग राहिला नाही. त्यामुळे असे अनेक ललित राज्यात मोकाट फिरत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यंत आहेत, याचा छडा सरकारने लावला पाहिजे. यासाठी विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

ओबीसींच्या संदर्भात सरकारचे इतिवृत्तच फसवे

वडेट्टीवार म्हणाले, नागपूर येथे ओबीसींच्या (OBC quota) विविध संघटनांची बैठक झाल्यानंतर सरकार हादरले. त्यानंतर सरकारने घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर करण्यात आले. मात्र हे इतिवृत्तच फसवे असून सरकार ओबीसींच्या तोंडाला पाने पुसत आहे. जातनिहाय जनगणनेची (castewis census) मागणी आम्ही सातत्याने करतो आहे. राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील ही भूमिका मांडली आहे. त्यावर सरकार अनुकूल असल्याचे सांगत ओबीसींची फसवणूक करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वर्ष संपत आले तरी मुलांना वसतीगृह नाही. ओबीसींच्या महामंडळाला (OBC Corporation) निधी देताना दुजाभाव केला जात आहे. हा निधी का कमी दिला जातो याचे स्पष्टीकरण सरकारमधील ओबीसी नेत्यांनी द्यावे. कर्ज घेतलेल्यांना नोटीसा देऊन त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींसाठी घरकुल योजनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी महायुती सरकार (Maha Yuti Sarkar) करत नाही. वसतिगृहाचा विषय आला की, अर्थ खाते फाईल अडवून ठेवते. त्यामुळे परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजना हे सरकार राबविणार नाही. हे सरकार ओबीसींचे वाटोळे करणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सरकारचे आता दिवस भरले आहेत, असा इशाराही वडेट्टीवार यांनी सरकारवर दिला.

विमा कंपन्याना सरकारला जुमानत नाहीत

राज्यातील ३,९०० गावात सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. सोयाबीन पीक वाया गेले आहे. विमा कंपन्यांना सरकारने २३०० कोटी रूपये दिले आहेत. तरीही या कंपन्या संपूर्ण भरपाई देत नाहीत. पीक विम्याच्या अग्रीम ऐवजी संपूर्ण भरपाई का मिळत नाही याचे सरकारने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

अंतर्गत कलहामुळे या सरकारचे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. दिवस ढकलण्याचे काम हे सरकार करत आहे. मलिदा खाण्यात दंग असलेले हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात