ताज्या बातम्या राष्ट्रीय

Election commission : ज्ञानेश कुमार,सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड

X: @therajkaran

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आणि सुखबीर संधू (Sukhbir Singh Sandhu) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. या नावावर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर अधिसूचना काढण्यात येणार आहे. 

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर होण्यापूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखविंदर संधू हे पंजाबमधील आहेत. सुखबीर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते गृह मंत्रालयात होते. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृह मंत्रालयात होते. दरम्यान, या प्रक्रियेसंदर्भात आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.  

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी नवीन नियुक्तीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयुक्त पदासाठी आपल्याकडे २१२ नावे एका दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे रात्रभर मी विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सहा नावे माझ्याकडे दिली गेली. त्यामुळे आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहे, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर, तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्ये आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार राहिले होते. गोयल, ज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता, परंतु त्यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला. त्यानंतर नवीन नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे