महाराष्ट्र ताज्या बातम्या

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय – एम) महासचिव एम.ए. बेबी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे संवाद साधला. हा संवाद आयोगाद्वारे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या चर्चेच्या मालिकेचा एक भाग असून या संवादाद्वारे पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहचविण्याची ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

निवडणूक प्रक्रियेचे बळकटीकरण अधिक प्रभावीपणे करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून सर्व संबंधित घटकांच्या सहभागाने विद्यमान कायदेशीर चौकटीत निवडणूक प्रक्रिया अधिक मजबूत बनवण्याचा हा प्रयत्न आहे. याआधी, आयोगाने बहुजन समाज पार्टीच्या (बसप) नेत्या कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी 6 मे 2025 रोजी आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजप) अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी 8 मे 2025 रोजी भेट घेतली होती. आतापर्यंत एकूण 4 हजार 719 सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 40 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 800 आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी 3 हजार 879 बैठकांचे आयोजन केले असून या माध्यमातून 28 हजारांहून अधिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात