महाराष्ट्र ताज्या बातम्या

लेकीच्या स्वार्थासाठी पवारांनी पातळी सोडली, दात विचकून हसणाऱ्या डॉ कोल्हेचा बुरखापण फाटला

X: @ajaaysaroj

लेकीच्या स्वार्थासाठी पातळी सोडून बोलणारा बाप संपुर्ण महाराष्ट्राने काल बघितला. गेली पाच दशके महाराष्ट्रातील जनतेला पुरोगामीत्वाचे डोस पाजणाऱ्या शरद पवार यांचा दांभिक बेगडी चेहरा देशासमोर उघडा पडला. तर पवारांच्या मांडीला मांडी लावून दात विचकून हसणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा मुखवटा किती बेगडी आहे, त्यांच्या मनात स्त्रीबद्दल काय भावना आहेत हे पण या निमित्ताने शिवप्रेमी जनतेसमोर उघड झाले.

बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. सुनेत्रा या मूळ धाराशिव येथील तेर च्या राजकीय घराण्यातील आहेत. राज्यातील मोठे नेते पद्मसिंह पाटील यांच्या सुनेत्रा भगिनी आहेत. पवार घराण्यात त्या सून म्हणून आल्या त्याला देखील चाळीस वर्षे होत आली. सुनेला मुलीचाच नव्हे तर थेट गृहलक्ष्मीचा मान या देशात दिला जातो. पुरोगामी महाराष्ट्राने देखील लेकी सुना असा भेद कधीच केला नाही. दुसऱ्याच्या सुनेला देखील आईचा मान देणाऱ्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. कदाचित आपल्या लाडाची लेक असलेल्या सुप्रिया सुळेंच्या पराभवाची भीती आता शरद पवारांच्या वागण्यात दिसू लागली आहे की काय हे समजायला मार्ग नाही.

पवारांना असणारी ही भीतीच पुण्यात एका पत्रकार परिषदेत समोर आली असावी, आणि बोलताना पवारांचा इतके दशके जपलेला ढोंगीपणा जनतेसमोर आला. बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकी संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारला गेला. प्रश्न थेट सुप्रिया व सुनेत्रा यांच्या बाबत असल्याने शरद पवारांचा तोल गेला. त्यांनी मूळ पवार असणाऱ्या पवारांना मत द्या बाहेरून आलेल्या पवारांना नको असे अपमानास्पद विधान करत अजित पवार यांच्या पत्नी व पवार घराण्यात बाहेरून आलेली लेक सुनेत्रा यांची खिल्ली उडवली. पवारांच्या नजरेत घरातल्या कन्येसमोर बाहेरून आलेल्या सुनेची किंमत शून्य आहे हे काल अवघ्या महाराष्ट्राने पाहिले.

संतापजनक बाब म्हणजे या वेळी उपस्थित असणारे पुण्यातील ज्येष्ठ नेते अंकुश काकडे , शिरूर मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे आणि इतर पदाधिकारी निर्लज्जपणे हसत होते. ज्या छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमुळे अमोल कोल्हे घराघरात पोहचले त्या वंदनीय छत्रपतींची शिकवणच जणू डॉ कोल्हे यांनी खुंटीला टांगली असल्याचे त्यांच्या बेशरम हसण्यातून दिसत होते. कल्याणच्या सुभेदाराची सून जेंव्हा दरबारात आणली गेली तेव्हा , छत्रपती शिवरायांनी तिचा साडी चोळी देऊन सन्मान केला. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती , आम्हीही सुंदर झालो असतो , असे गौरवोद्गार काढून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साक्षात आपल्या आईचा दर्जा छत्रपतींनी दिला. तर इकडे पत्रकार परिषदेत छत्रपती शिवरायांच्या भूमिका वठवणाऱ्या अमोल कोल्हे यांनी पवारांच्या विधानावर जोरजोरात खिदळत आपल्या चेहऱ्यावरचा छत्रपतींचा मुखवटा खोटा असून, त्याच्यामागे लपलेला खरा चेहरा खलनायकी दर्जाचा आहे हे सिद्ध केले.

शरद पवार यांच्या विधानाचा भाजप ,शिवसेना , राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी निषेध केला आहे. विविध स्त्री संघटनांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. पण स्त्रीवादाचा ढोल पिटणाऱ्या , आपणच एकट्या स्त्री कैवारी आहोत हे कायम दाखवणाऱ्या आणि ज्यांच्या साठी शरद पवारांनी इतकी खालची पातळी गाठली त्या सुप्रिया सुळे मात्र या विधानावर मूग गिळून बिळात जाऊन लपल्या आहेत.

येणाऱ्या निवडणुकीत पवारांचे हे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाला अडचणीत आणते , की जनता हे सगळे विसरून जाते ते निवडणूक निकाल लागल्यानंतरच कळणार आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात