ताज्या बातम्या महाराष्ट्र

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राज्यसभेसाठी चाचपणी केल्याची चर्चा

मुंबई

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मोतीश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रघुराम राजन आणि ठाकरे कुटुंबाचा एक फोटो समोर आला आहे. या भेटीत रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचं सांगितलं जात आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, त्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मोदी सरकार विरोधात टीका
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारविरोधात अनेकदा टीका केली आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातही रघुराम राजन यांनी निराशा व्यक्त केली होती. याशिवाय मोदींच्या अनेक आर्थिक धोरणांवर त्यांनी थेट विरोध केला आहे. आता राज्यसभेत येऊन ते थेट मोदींविरोधात उभे राहतील अशी शक्यता मोतीश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने वाढली आहे.

शिवसेनेकडून कोणाकोणाला राज्यसभेसाठी संधी मिळाली?

  • चंद्रिका केनिया
  • राजकुमार धूत
  • राम जेठमलानी
  • प्रियंका चतुर्वेदी
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात