ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रम – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आरोग्यसेवेत नवा अध्याय

बारामतीत सुरू झाला रुग्णसेवेचा नवा आयाम

बारामती : आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या बालकांसाठी एक दिलासादायक उपक्रम बारामतीत सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने गरजू बालकांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

बारामतीतील मुथा हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा आणि डॉ. सौरभ मुथा यांच्या सहकार्याने, मुंबईतील प्रख्यात शल्यविशारद डॉ. संजय ओक आणि त्यांचे सहकारी हे बालकांवर सेवाभावी वृत्तीने मोफत शस्त्रक्रिया करत आहेत.

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ३० बालकांवर विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार असून, त्यात हर्निया, टाळूला चिटकलेली जीभ दुरुस्त करणे, तसेच शरीरावरील गाठी काढणे यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तसेच डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, अनिल नवरंगे, अनिल जोगळेकर, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, प्रियांका मुथा, डॉ. अनिल मोकाशी, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी नितीन हाटे, किरण तावरे आणि प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे उपस्थित होते.

“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून बारामतीत हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प आहे. यामुळे गरजू बालकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल,” असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

या अभिनव उपक्रमामुळे बारामतीतील गरजू कुटुंबांसाठी आरोग्यसेवेचे नवे दार खुले झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम एक मोठी संधी ठरणार आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात