Twitter : @NalavadeAnant
मुंबई
आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून (Gram Panchayat election results) अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेनेच शिक्कामोर्तबच केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी सोमवारी विरोधकांना परखड शब्दात खडेबोल सुनावले.
पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे योगदान किती मोठे आहे, हे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Meeting between PM Narendra Modi and Praful Patel) यांनी जो त्यांच्याशी संवाद साधला त्यावरून दिसून येतो. त्यामुळे माझ्या नेत्याचा अभिमान आम्हाला आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
भाजपबरोबर गेलो म्हणजे आम्ही जातीयवादी झालो, असा आरोप आता आमच्यावर करण्यात येतो. मात्र ज्यावेळी भाजपला पाठिंबा दिला, त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी भाजपसोबत (BJP) जाण्यासाठी खुद्द शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती मग ते काय होते? अशी संतप्त विचारणाही खा. तटकरे यांनी केली.