मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असताना आता गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणप्रकरणी सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे. 27 फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीत केलेल्या बदलालाही आव्हान देण्यात आलं आहे.
निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक चुकीची असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. दुसरीकडे आरक्षणाला समर्थन देत विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याचा राज्य सरकारचा दावा असून लवकरच मराठा आरक्षणाचा लढा उच्च न्यायालयात सुरू होणार आहे.