X: @therajkaran
मुंबईतील विश्वभरारी फाऊंडेशनच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याचे औचित्य साधून पालघर येथील आनंद वृद्धाश्रमात मराठी कविता, गाणी, अभिवाचन तसेच अन्य उपक्रमांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत विरंगुळ्याचे क्षण अनुभवले. संस्थेच्या अध्यक्ष लता गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. आनंद वृद्धाश्रम सेवा ट्रस्टच्या प्रमुख मनिषा आणि प्रदीप कोटक हेही यावेळी सहभागी झाले होते.
वयाच्या ६० नंतर प्रत्येकाचे एक नवे आयुष्य निर्माण होत असते, ्याचा आनंद घेत आणि आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी अधिकाधिक करण्यावर तसेच स्वतःही सुखात राहण्यासाठी हा उत्तम काळ असतो, त्याचबरोबर ज्येष्ठांचे मार्गदर्शन तरुण पिढीनेही अवश्य घ्यावे, असे विचार लता गुठे यांनी यावेळी व्यक्त केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश राणे, गुरुनाथ तेंडुलकर, मुकुंद सराफ, प्रतिभा सराफ, रत्नप्रभा गोमसे, डॉ. श्वेता वर्पे, दीप्ती मयेकर, दीप्ती मयेकर, अल्पना कशाळकर, जयश्री चौधरी, अशोक मोहिले, सु. बा. सरपडवळ आदींनी यावेळी विविध सादरीकरण केले. चारुलता काळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अशोक शिंदे यांनी मानले.