मुंबई: महाविकास आघाडीच्या (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांची उद्या मंगळवारी होणारी बैठक २८ फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी येथे केली.
महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची (Seat sharing meeting of Maha Vikas Aghadi) चर्चा करण्यासाठी २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सोमवारी आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. याबाबतची माहिती स्वतः आंबेडकर यांनी एक्स या समाज माध्यमातून दिली.
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार होते. मात्र, २७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Agahdi – VBA) होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणे शक्य होणार नाही. कारण या जाहीर सभेला राज्याची पूर्ण समिति पुण्यात असणार आहे. त्यामुळे बैठकीची तारीख २७ ऐवजी २८ होणार असेल तर आम्ही येऊ, असे आंबेडकर यांनी जयंत पाटील यांना कळवले आहे.