मुंबई : कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने त्याचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत केली.
कोल्हापुरात या मागणीसाठी आज विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत, असे क्षीरसागर यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले.
महापुरुषांच्या नावाचा आदराने उल्लेख व्हावा, त्यांच्या नावासोबत एकेरी उल्लेख न करता पूर्ण नाव वापरण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.