Twitter : @therajkaran
मुंबई :
भाजपाने हिंदुत्वाचे पेंटंट घेतले नसून भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही. बाळासाहेब (Balasaheb Thackeray), प्रबोधनकार (Prabodhankar Thackeray) यांच्या पर्यंतच ठाकरेंबद्दल माहिती आहे. मात्र पणजोबा सीताराम ठाकरे (Sitaram Thackeray) यांचे पनवेलमधील प्लेग साथीत लढताना जीव गमावला होता. त्यामुळे घराणेशाहीतलाच मी आहे. यात माझा दोष नाही, असे सांगत निवडणुक आयोग चिन्ह दुसऱ्याला देऊ शकते. मात्र पक्षाचे नाव दुसऱ्यांना देऊ शकत नाही, असे सांगत शिवसेनेच्या उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission of India) टिका केली. दरम्यान, न्यायव्यववस्थेवर विश्वास असल्याचे सांगत निस्पृह न्याय होण्याची शक्यता वर्तवली. संपादक राहुल गडपाले यांच्या “अवतरणार्थ” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. मात्र प्रबोधनकारांचेही वडील सीताराम ठाकरे यांच्या बद्दल किती जणांना माहिती आहे? असा सवाल उपस्थित करत सीताराम ठाकरे यांच्या प्लेगसाथीतील कार्याची माहिती त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिली. सीताराम यांच्या काळात पनवेलमध्येही प्लेग मोठा पसरला होता. त्यावेळी मृत्यू झाले होते. प्रेत घेऊन जायला कोणी नव्हते. इथेही घराणेशाहीचा संबंध येतो. यात सिताराम यांचे देहावसन झाले.
अत्यावश्यक प्रसंगात काम करण्याच्या घराणेशाहीतलाच मी असून यात माझा दोष नाही, असे ठाकरे म्हणाले. प्लेगवेळची स्थितीही करोनासारखी होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) फोनवर आवश्यक सेवा सुरु ठेवणार असल्याची माहिती दिली होती. मात्र माझायवर घरी बसून काम करायची सवय असल्याची टिका होत आहे. या टिकाकारांना, तुम्ही आम्हाला शिकवू नये असा सज्जड दम ठाकरे यांनी दिला. यावेळी न्यायाधीश चंद्रचूड (Justice Chandrachud) यांचे कौतुक करत निस्पृह व्यक्तीच जनतेला खरे ते सांगू शकते. चंद्रचूड हुकुमशाहीला चूड लावतील. सर्वोच्च न्यायालय न्यायाने चालले असून त्याबद्दल आशा असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.