मुंबई : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार कारागृहात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे . आज त्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे .अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव (PA) बिभव कुमार (bibhav kumar )यांना व्हिजिलेंस डिपार्टमेंटने बडतर्फ केले आहे. दक्षता संचालनालयाने 10 एप्रिलपासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बिभव कुमार यांची सेवा समाप्त केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता आणि वैयक्तिक सचिव बिभव कुमार यांनी त्यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली होती .केजरीवालांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यापासून आप (AAP) संयोजकांची त्यांच्याशी ही पहिली वैयक्तिक भेट होती.. तुरुंग प्रशासनाने त्यांना अर्धा तास भेटण्याची परवानगी दिली होती . याआधी दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने बिभव कुमार यांचीही अनेकवेळा चौकशी केली आहे.मात्र आता त्यांना बडतर्फ केल्याने मुख्यमंत्री केजरीवालांना मोठा झटका बसला आहे . दरम्यान याआधी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद (Raaj Kumar Anand )यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . आपलेच मुख्यमंत्री भ्रष्टाचारात अडकल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला होता. केजरीवाल यांच्या सरकारमध्ये गोपाल राय, इम्रान हुसेन, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, आतिशी यांच्यासह राजकुमार आनंद सुद्धा मंत्री होते. पण भ्रष्टाचाराचे आरोप पाहून राजकुमार आनंद यांनी आप आदमी पक्षाला रामराम ठोकला आहे .
मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाली असूनही त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. तुरुंगातूनच ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे म्हणून दिल्ली हायकोर्टमध्ये (Delhi High Court )याचिक दाखल करण्यात आली होती.पण, हायकोर्टाने त्यांच्या जामिनासाठी केलेली याचिका आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्तेला खडे बोल सुनावत 50 हजार रुपयांचा दंड ठोठवला. त्यामुळे आप च्या मागे लागलेला अडचणीचा ससेमिरा काही संपत नसल्याचे दिसून येत आहे.