X : @therajkaran
मुंबई
पीएपी घोटाळा: किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजना घोटाळ्यात म्हणजेच पीएपी घोटाळ्यात गंभीर आरोप केले आहेत. हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. शाहिद बलवा आणि पवार यांच्या निकटवर्तीय चोरडिया यांना याचा फायदा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. एक हजार ९०३ सदनिका बांधण्यात येत आहेत. त्यासाठी वेगवेगळे आरक्षण रद्द केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी हा दावा केला आहे की, एबीपी माझाच्या वृत्तानुसार, मुंबई महापालिकेतील ठाकरे सरकारच्या 2000 कोटी रुपयांच्या पीएपी घोटाळ्यात आता शरद पवार आणि पवार कुटुंबीयांची नावे समोर आली आहेत. पीएपी घोटाळ्यात पवार कुटुंबाचा हात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. 1903 सदनिका पालिका बाजारभावाने 58 लाख रुपयांना एक फ्लॅट खरेदी करणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन आणि बांधकाम खर्चाच्या स्वरूपात 15 ते 17 लाख रुपये खर्च येणार आहेत.
सोमय्या यांनी आरोप केला आहे की, शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी आणि चोरडिया बिल्डर्सची न्यू वर्ल्ड लँडमार्क एलएलपी कंपनी एका फ्लॅटमधून 40 लाख रुपयांचा नफा होईल.