कोल्हापूर
लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नसल्याचं शाहू महाराजांनी साधारण ५ महिन्यांपूर्वी विधान केलं होतं, विशेष म्हणजे शरद पवारांनी कोल्हापूरातील एका कार्यक्रमावेळी याचा उल्लेखही केला होता, आता मात्र शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी या तिकीटासाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा होती. मात्र कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचं संभाजी राजेंनी जाहीर आहे. यानंतर आता शाहू महाराजांचं नाव समोर येत आहे. स्वराज्य पक्ष असताना मी दुसऱ्या कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवणार नसल्याचं उत्तर संभाजी राजेंनी ट्विट करून दिलं आहे.
मविआतील एका पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, संभाजी राजे स्वत:च्या पक्षातून निवडणूक लढवणार असतील तर मविआ त्यांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. मात्र संभाजी राजे यांच्या ट्विटनंतर मविआने मोर्चा शाहू महाराजांच्या दिशेने वळवला आहे. शाहू महाराजांच्या नावावर तिन्ही पक्षाची सहमती असल्याचंही सांगितलं जात आहे. शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.