चेन्नई
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय याने राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आज त्याने आपल्या पक्षाची घोषणा केली. अभिनेत्याने आपल्या पक्षाचं नाव ‘तमिलागा वेत्री कझम’ ठेवलं आहे.
विजय याने पक्षाची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी केली आहे. मात्र यंदा मैदानात उतरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. अभिनेता विजयने एक विधान जारी केलं आहे. ‘आम्ही 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. सर्वसाधारण आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे.
दलपती विजय अभिनयासोबतच समाजसेवेसाठीही ओळखले जातात. डिसेंबर 2023 मध्ये विजयने थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यातील पूरग्रस्त रहिवाशांना मदत केली होती. पूरग्रस्त कुटुंबांसाठी विजयने घरातील साहित्याचं वाटप केलं होतं.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2023 मध्ये विजय ‘लिओ’ आणि ‘वरिसू’ चित्रपटात दिसला होता. तो सध्या त्याचा आगामी चित्रपट थलपथी 68 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू करत आहेत. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विजयने राजकीय क्षेत्रात पदार्पण करणं यामुळे चाहत्यांमध्ये आनंद आहे.
सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तमिळ अभिनेता आहे. तो त्याच्या आगामी ‘थलापथी 65’ या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन घेत आहे. फीच्या बाबतीत त्याने ‘दरबार’साठी 90 कोटी रुपये घेतलेल्या रजनीकांतलाही मागे टाकले आहे.