X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabhe elections) देशात वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यामध्ये चर्चेचा विषय असलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघात काटे की टक्कर होणार असे चित्र आहे. कारण महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना उमेदवारी दिल्यानंतर आता महायुतीकडून भाजप नेते समरजीत घाटगेंना (Samarjeet Sinh Ghatge) उमेदवारी देऊन नवीन रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतुन संभाजी राजे छत्रपती यांनी माघार घेत करवीर संस्थांनचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना पाठींबा दिला. मात्र आता घाटगे यांचे नाव चर्चेत आल्याने कोल्हापूरमध्ये जोरदार कांटे की टक्कर होणार हे मात्र निश्चित आहे. महाविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याने महायुतीने देखील नवीन खेळी खेळली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी समरजीतसिंह घाटगे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. घाटगे यांना मुश्रीफांविरोधात सातत्याने बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दुसरीकडे समरजीत सिंह घाटगे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरल्यास कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) कोणती भूमिका घेणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांनी यांनी सर्व घडामोडींवर मौन बाळगलं आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.
पालकमंत्री हसन मुश्रीफ ईडीच्या (ED) रडारवर आल्यानंतर त्यांनी सातत्याने समरजीतसिंह घाटगे यांच्याकडे बोट केलं आहे. त्यामुळे घाटगे हे जर आताच्या लोकसभेसाठी उमेदवार झाल्यास मुश्रीफ आगामी विधानसभेसाठी आपला मार्ग करून घाटगे यांना पूर्ण मदत करणार का? याकडे सुद्धा लक्ष लागले आहे. घाटगे आणि मुश्रीफांमध्ये छत्तीसचा आकडा असल्याने राजकीय कारकिर्दीत दोघही एकमेकांविरोधात नेहमीचं उभे राहिले आहेत.