महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule on Uddhav : तुम्हीच दगाबाजी केली : बावनकुळेनंचा ठाकरेंवर पलटवार

X: @therajkaran

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना (Uddhav Thackeray) 2019 ला मातोश्री निवासस्थानी अमित शहांसोबत (Amit Shah) झालेल्या बैठकीचा मुद्दा उकरून काढला. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे यांचीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘उद्धवजी, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणाले. पण वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावलं. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का? ज्यांनी तुम्हाला भावासारखं प्रेम दिले, त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती (Baramati) आणि दिल्लीसमोर (Delhi) कुर्निंसात करत होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची (Aai Tulaja Bhavani) कशाला खोटी शपथ घेता? तुम्हीच दगाबाजी केली! होय, तुम्हीच!!, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर घणाघात केला आहे.

2019 च्या विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुकीत भाजपाने (BJP) अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. मात्र आता ते खोटे बोलत आहेत. आई तुळजाभवानी देवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह (Amit Shah) खोटे बोलत आहेत, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते. यावर बावनकुळे यांनी ट्विट करत, आता तुमचे पद गेले, पक्ष गेला, निशाणी गेली, विश्वासू माणसेही गेली. हिंदुत्व नासवले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून बसले, सनातन धर्मावर मिंधे झाले. प्रभू श्रीराम (Prabhu Shree Ram) प्रतिष्ठापनेत राजकारण आणलं. हाती धुपाटणं आले म्हणून पुन्हा ‘बंद खोलीतील’ रडगाणं सुरु झालं. तुम्ही आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका. जय महाराष्ट्र’, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

ट्विटमध्ये पुढे त्यांनी म्हटलं, की, ‘निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित भाई घेत होते, तेव्हाच हा खुलासा का केला नाही? कारण, काँग्रेस (Congress) आणि शरद पवार 9Sharad Pawar) यांच्याशी तुमच्या गोपनीय चर्चा सुरु होत्या. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून होतो आणि आता कुलस्वामिनीसमोर खोटी शपथ घेता? असा हल्लाबोल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात