मुंबई – कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.
यंदा आंबा व काजू पिकावर आलेला मोहोळ मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
ते म्हणाले की, उपलब्ध माहितीच्या आधारे नुकसानीची तीव्रता लक्षात येत असून यापूर्वी अशा परिस्थितीत दिलेल्या मदतीचा विचार करून यावेळीही सर्व बाबींचा सांगोपांग आढावा घेऊन मदत जाहीर केली जाईल. यासाठी उपमुख्यमंत्री, कृषी व फलोत्पादन विभाग तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतले जाईल.
या बैठकीला उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, माजी केंद्रीय मंत्री Narayan Rane, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बंदरे मंत्री नितेश राणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी नुकसानीबाबत सादरीकरण केले. कोकणातील लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देत तातडीने मदतीची मागणी केली.
दरम्यान, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
या बैठकीनंतर कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

