महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘Ladki Baheen’ योजनेचा अक्षय तृतीयेला मिळणार – मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या ३० एप्रिल रोजी, अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्या, “या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 रुपये थेट DBT पद्धतीने दिले जात आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळकटी देते तसेच आरोग्य व पोषणासाठीही उपयुक्त ठरते.”

त्यांनी सांगितले की, 2.52 कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून, जानेवारी व फेब्रुवारीचे हप्ते मार्च महिन्यात वितरित करण्यात आले. एप्रिल हप्ता वेळेवर मिळावा यासाठी प्रशासनाने बँकांशी समन्वय साधला आहे.

अक्षय तृतीया हा सण समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या दिवशी हप्ता जमा होणे लाभार्थींना आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारे ठरेल, असे मंत्री तटकरे म्हणाल्या.

दरम्यान, योजनेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आगामी काळात हप्ता ₹2,100 रुपये करण्याचा विचार सरकार करत असल्याचे संकेतही देण्यात आले, मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

बँक खात्याची खात्री करा – प्रशासनाचा सल्ला
योजनेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी लाभार्थ्यांनी आपली आधार संलग्न बँक खाती तपासून घेण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात