जात,धर्म,प्रांत आणि भाषे पेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटी ही भारतीयच आहोत.अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.त्यांनी देशात सामाजित समता आणि आर्थिक समता स्थापन व्हावी असे स्वप्न पाहिले होते.त्यांचे सामजिक आणि आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा आपण निर्धार करुया हिच खरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दुपारी 3.30 वाजता चैत्यभुमी दादर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.
त्यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ.सिमाताई आठवले आणि पुत्र जित आठवले उपस्थित होते.रिपाइं चे मुबंई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे;रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे; चंद्रशेखर कांबळे;अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे;रवि गायकवाड,मयुर बनसोडे खटाव आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
दलितांवर अत्याचार होत असले तरी दलित आणि सवर्ण यांच्यात सामजिक ऐक्य व्हावे,दलित सवर्ण एकजुट व्हावी;सामजिक समता नांदावी,समतावादी भारत निर्माण व्हावा अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती.भारताची एकता आणि अखंडता मजबुत व्हावी हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर देह रुपाने जरी गेले असले तरी ते विचाराने आपल्यात आहेत.देश हितासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत जगले आणि जागले.त्यामुळे हा देश जागा झाला आहे.त्यांनी क्रांति करुन समतेवर आधारित भारत देश उभा केला आहे.जर या देशाच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर ,या देशाचे काय हाल झाले असते ते सांगता येत नाहीत.असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
6 डिसेंबर हा दिन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने दु:खाचा दिवस जरी असला तरी आमच्या प्राणप्रिय मुक्तीदात्याला ;महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञतेने अभिवादन करण्याचा आणि प्रेरणा घेण्याचा दिन आहे.असे सांगत
ना.रामदास आठवले यांनी सकाळी नवी दिल्लीत संसदेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पाजंली वाहुन विनम्र अभिवादन केले.त्यानंतर नवीदिल्लीतील त्यांच्या निवास स्थानी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन केले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दी प्रमुख