मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. यात भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 195 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश आहे. आगामी निवडणुकीत आपल्या अनेक विद्यमान खासदारांना तिकीट न देण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे.
दरम्यान या यादीत मुंबईतील तीन नेत्याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. हेमा मालिनी, रवि किशन आणि कृपाशंकर या तिघांना तिकीट देण्यात आलं आहे. यापैकी हेमा मालिनी यांना मथुरा, रवि किशन शुक्ला हे गोरखपूर तर कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातून तिकीट देण्यात आलं आहे. या तिघांशिवाय मुंबईतील आणखी ६ ते ७ जणांचा या यादीत समावेश असल्याची माहिती आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, मध्य प्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, कर्नाटकातील 12, तेलंगणातील 09, आसाममधील 11, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू आणि 5 जणांचा समावेश आहे. काश्मीर, उत्तराखंडमधून 2, अरुणाचल प्रदेशातून 2, गोव्यातून 1, त्रिपुरामधून 1, अंदमान आणि निकोबार बेटांमधून 1 आणि दमण आणि द्विवमधून 1 नावांची घोषणा करण्यात आली आहे.