मुंबई : भाजपच्या स्थापनादिनानिमित्त मुंबईत ४०० कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ४०० पारची घोषणा करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने ६ एप्रिल भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने मुंबई विविध ठिकाणी ४०० कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई भाजप सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आदी उपस्थित होते.
मुंबईतील महायुतीचे सहाही उमेदवार मताधिक्याने निवडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शेलार यांनी दिली. गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून एक हजार ठिकाणी बैठका आणि सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी संविधान संरक्षक भाजप कार्यकर्ता अशा आशयाचे १४ मेळावे आणि १४० वस्त्यांमध्ये संवादाचे कार्यक्रमाचे आयोजन
- गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून १००० कार्यक्रम घेणार
- रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम