मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा यात करण्यात आलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन ही यादी जाहीर केलेली आहे.
कुणाला कुठं उमेदवारी
१. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
२. यवतमाळ वाशिम- संजय देशमुख
३. नावळ- संजय वाघेरे
४. सांगली- चंद्रहार पाटील
५. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
६. संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
७. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
८. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
९. नाशिक- राजाभाऊ वाजे
१०. रायगड- अनंत गिते
११. रत्नागिरी- विनायक राऊत
१२. ठाणे- राजन विचारे
१३. मुंबई इशान्य- संजय दिना पाटील
१४. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
१५. मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर
१६. परभणी- संजय जाधव
17. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
संभाजीनगर, सांगलीवरुन वादाची शक्यता
संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही इच्छुक होते. मात्र त्यांना संधी न देता खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळं दानवे यांच्या नाराजीची शक्यता आता वर्तवण्यात येतेय. दोन दिवसांपासून महायुतीकडून दानवेंना संपर्क करण्यात येत असल्याचीही चर्चा आहे.
दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केल्यानं हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगलीत महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
दक्षिण मध्यवरुन वादाची शक्यता?
दक्षिण मध्य मुंबईवरुन काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तिढा असल्याचं सांगण्यात येतंय. आता ही जागा अनिल देसाईंना जाहीर केल्तयानं या जागेवरुनही वाद होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसला जाणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासमोर कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता उर्वरित नावं येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.