नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून विरोधी पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. दरम्यान काल ९ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जागावाटपावरुन इंडिया आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात बैठक पार पडली.
बैठकीबाबत एका वृत्त समुहाने दिलेल्या बातमीनुसार, राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २०-२० जागांवर निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला २ जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वीपर्यंत काँग्रेसकडून २६, शिवसेनेकडून २३ आणि प्रकाश आंबेडकरांकडून १२ जागांची मागणी केली आहे.
काल झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, बैठक संपल्यानंतर आम्ही आनंदात बाहेर पडलो आहोत. संघर्षाच्या या काळात आम्ही एकमेकांसोबत राहू आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जागा घेऊन येऊ असंही राऊत यावेळी म्हणाले. जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत,