महाराष्ट्र

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीवर गुन्हा दाखल

तपासासाठी स्वतंत्र समिती गठीत

By Milind Mane

Twitter : @milindmane70

महाड: महाड औद्योगिक क्षेत्रातील ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये झालेल्या अपघातानंतर अकरा कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कंपनी प्रशासन आणि मेंटनस मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीची देखील स्थापना केली आहे.

ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये आग लागून झालेल्या अपघातात अकरा कामगारांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कंपनी प्रशासन आणि संबंधित सरकारी यंत्रणेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देखील मृतांच्या नातेवाईकांकडून व औद्योगिक क्षेत्रातील अन्य कंपन्यांमधील कामगार वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याने आज कंपनी प्रशासन विरोधात भा.द.वि .कलम ३०४, ३०८, २८५, २८६, ३४ अन्वये आणि मेंटेनन्स मॅनेजर शैलेश जोशी यांच्यावर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातास कारणीभूत असलेल्या यंत्रणाची सखोल चौकशी करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हशे यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत केली आहे. यामध्ये महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे हे अध्यक्ष असून यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे जी.एस. हरलय्या, कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ, यांसह इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ज्या – ज्या अधिकाऱ्यांकडे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या नियंत्रणाचा कारभार आहे, त्याच अधिकाऱ्यांकडे चौकशी दिल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच या चौकशी समितीवर राजकीय हस्तक्षेप आल्यास चौकशी समिती निपक्ष:पाती काम करू शकेल का? असा सवाल मृतांच्या नातेवाईकांमध्ये तसेच औद्योगिक क्षेत्रातील अन्य कंपन्यातील कामगार वर्गाकडून विचारला जात आहे. तसेच चौकशी समितीमार्फत आलेला अहवाल कायदेशीर कारवाईस पात्र राहील का? तसेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकणार तर नाही ना? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात