महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : महाड फाळकेवाडी बसला ताम्हणे गावाजवळ अपघात; दोन महिला किरकोळ जखमी

महाड – महाड फाळकेवाडी बसला ताम्हणे गावाजवळ निसरड्या रस्त्यामुळे झालेल्या अपघातात दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या. जखमींना विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडण्यात आले.

महाड आगारातून सुटलेली फाळकेवाडी बस (क्र. MH-20-BL-3074) दुपारी तीनच्या सुमारास महाडकडे येत असताना टायर रस्त्याच्या कडेला खचल्याने हा अपघात झाला. जखमींमध्ये महाड पंचायत समितीचे माजी सभापती सत्यवान कदम यांच्या पत्नी आणि बागअळी, विन्हेरे येथील शरद नाना सकपाळ यांच्या पत्नीचा समावेश असून त्यांना दोन टाके पडले.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी हा रस्ता एसटी वाहतुकीस धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बस दरीकडे गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, असे ग्रामस्थांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात