महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमधील दुकानांच्या पाट्या मराठीत लावाव्यात; अन्यथा आंदोलनाचा इशारा

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना दुकानांच्या मराठी पाट्यांबाबत निवेदन देताना मनसेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे आणि पदाधिकारी.

मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांचे नगरपालिकेला निवेदन

महाड : महाड शहरातील सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत लावण्याची सक्ती करावी, अन्यथा १५ दिवसांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील दुकाने व आस्थापनांच्या नावाच्या पाट्यांवर मराठी भाषा ठळकपणे असणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत कारवाईची प्रक्रिया सुरू केली असतानाही महाड शहरातील काही दुकाने आणि आस्थापनांनी अद्याप मराठीतील नामफलक लावलेले नाहीत.

महाड शहर व परिसरातील सर्व संबंधित दुकानदारांनी पुढील १५ दिवसांत मराठीतील पाट्या लावाव्यात. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव अमोल दळवी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख, महाड शहराध्यक्ष शंतनू पिसाट, रायगड जिल्हा आस्थापना संघटक शेखर सावंतप्रदीप पिसाट यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात