महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड : मोटरसायकल – एसटी अपघातात एक ठार, एक जखमी

X : @milindmane70

महाड: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी दासगाव गावाच्या हद्दीत निसर्ग हॉटेल समोर मोटर सायकल आणि एसटी बसमध्ये सामोरासमोर अपघात जल. त्यात मोटरसायकल वरील एक तरुणी ठार झाली तर एक जण जखमी झाला.

नितेश शंकर हिळम आणि त्याची बहीण छाया शंकर हिळम दोघे राहणार टोळ हे त्यांच्या मालकीच्या मोटरसायकल (क्रमांक एम एच ०६ -ऐ एक्स ३२१४) वरून महाड ते टोळ असा प्रवास करत होते. दासगावजवळ त्यांची मोटर सायकल गोरेगाव ते महाड जाणाऱ्या जाणारी एसटी बस (क्रमांक एम एच०७-सी-७४५४) हिला समोरासमोर धडकली. अपघातानंतर मोटरसायकलवरील दोन्ही जखमींना ग्रामस्थांनी महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारदरम्यान छाया हिळम हिचा मृत्यु झाला. जखमी नितेश याला पुढील उपचारासाठी माणगाव येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार बस चालकाने मोटरसायकलस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर चढली. यामुळे बसला मिळालेल्या दणक्याने बसचा दरवाजा जाम झाला आणि बसमधील सर्व प्रवासी काही काळ अडकून पडले. संकटकालीन दरवाज्यातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अनेक वयोवृद्ध महिलांना बाहेर काढताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागली.

अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.

Also Read: आनंद वृद्धाश्रमातील मान्यवरांनी अनुभवले सुखाचे क्षण

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात