Twitter: @therajkaran
मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Also Read: मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना – विजय वडेट्टीवार यांचा आरोप