X : NalawadeAnant
मुंबई – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार रमेश कीर यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करावे. मतदारांशी संपर्क व संवाद साधा, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाशी योग्य समन्वय साधून काम करा, महाविकास आघाडीचा (MVA) विजय नक्की आहे, असा विश्वास प्रदेश काग्रेसचे कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी शनिवारी पक्ष मुख्यालय टिळक भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
कोकण (Konkan) विभागातील संघटनात्मक १३ जिल्ह्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक प्रदेश कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या समन्वय समितीचे प्रमुख माजी मंत्री नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha electtion) जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. जनता भाजपच्या (BJP) विभाजनकारी व जनविरोधी राजकारणाला कंटाळली आहे. लोकसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच विजय होईल त्यासाठी मतादारांशी थेट संपर्क साधा, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करा.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar), समाजवादी पार्टी (Samajwadi Party), शेकाप (PWP), आम आदमी पक्षासह (Aam Aadmi Party) सर्व समविचारी पक्षांशी योग्य समन्वय साधून काम केल्यास आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही असेही खान यांनी ठासून सांगितले.