मुंबई
मराठा समाजाला ओबीसीमध्ये 9 टक्के आरक्षण देण्याचा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिलेला फॉर्म्युला मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळल्याची चर्चा सुरू असताना आता जरांगे पाटील याबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे.
सध्या जरांगे पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राठोड यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एक फॉर्म्युला दिला होता. यानुसार, मराठा 9 टक्के, भटके-विमुक्त 9 टक्के, बारा बलुतेदार 9 टक्के या फॉर्म्युल्याचा अवलंब करावं लागेल असं सूचवलं होत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर 27 टक्के ओबीसी मर्यादा वाढविण्यासाठी लढावं लागेल, असं राठोड म्हणाले.
दरम्यान जरांगे पाटील याबाबत सकारात्मकता दाखवत या फॉर्म्युलाचा अभ्यास केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. त्यांनी हा फॉर्म्युला फेटाळलं नसून यावर चर्चा आणि अभ्यास केल्यानंतर वक्तव्य केलं जाईल, असंही जरांगे पाटील यावेळेस माध्यमांशी बोलताना म्हणाले.