काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा सरकारवर आरोप…..
२० नोव्हेंबरला राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक पार पडत आहे.या निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता,यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असून यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे.त्यामूळे निवडणुका निष्पक्ष होणार नाही आणि हेच लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे,त्यामुळे आता निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.
चेन्नीथला म्हणाले की,पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचे काँग्रेसने सातत्याने निदर्शनास आणून दिले होत.त्यानंतर या संदर्भातल्या लेखी तक्रारी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडेही केली होती.त्यातच काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनाही हटवण्याची मागणी केली होती.काँग्रेस ची मागणी लक्षातच घेऊन निष्पक्ष निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करून संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. त्यानंतरही राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षातील बडे नेते पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आमच्या निदर्शनास येत असून हे लोकशाहीसाठी योग्य नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष यासंदर्भात निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करणार आहेच.पण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी हस्तक्षेप करावा, या मागणीचा पुनरुच्चारही चेन्नीथला यांनी केली.