Twitter : @NalavadeAnant
मुंबई
ज्येष्ठ निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर (IPS Dr Meeran Borwankar) यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्यांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमुर्तीं मार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole demands to relieve Ajit Pawar from the cabinet) यांनी सोमवारी सरकारकडे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला, ही गंभीरच बाब आहे. त्यावर सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारणाच आहेत. पण चौकशी करा अशी मागणी केली तर सरकारच सरकारची चौकशी कशी करणार? या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’,. त्यामुळे सरकारमध्ये जर काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच (Probe by a retired judge of the High Court) या प्रकरणी चौकशी केली पाहिजे तरच सर्व सत्य बाहेर येईल, असेही पटोले यांनी यावेळी नमूद केले.
पटोले म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी येरवड्याची पोलीस विभागाची जागा अजित पवार यांनी त्यांच्या जवळचा बिल्डर शाहीद बलवा (Builder Shahid Balwa) याला द्यावी म्हणून आपल्यावर कसा दबाव आणला हे पुस्तकात लिहिले होतेच. पण आज तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर शिक्कामोर्तबच करत गंभीर आरोप केले आहेत, याकडेही पटोले यांनी लक्ष वेधले.