Twitter : @NalavadeAnant
मुंबई
लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकांसाठी पक्ष आतापासूनच तयारीला लागला असून लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या सर्व मतदारसंघात काँग्रेसचे संघटन, सेल, विभाग, फ्रंटल ऑर्गनाझेशन, या सर्व घटकांनी पूर्ण ताकदीने काम करावे. प्रत्येक जागा जिंकण्याचा निर्धार करूनच कामाला लागा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी गुरुवारी येथे केले.
प्रदेश काँग्रेसचे विविध विभाग, सेल, आघाडी व संघटनांचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, समाजातील सर्व जाती, धर्माचे घटक व व्यवसायिकांना पक्षाशी जोडण्यासाठी ३९ सेल स्थापन केले आहेत. हे सर्व सेल तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत असून लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास आणखी दृढ होत आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे. जनतेपर्यंत पोहचा व काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार करून काम करा, असे आवाहन करीत भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे, भ्रष्ट, अन्यायी, अत्याचारी भाजपा सरकारला सत्तेतून उखडून टाकणे (dethrone the BJP from power) हेच काँग्रेसचे मुख्य ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.