मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून एकूण ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. ही उद्याने ‘नमो उद्यान’ या नावाने ओळखली जातील, अशी माहिती राज्यमंत्री Madhuri Misal यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
हा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य Bhaskar Jadhav यांनी उपस्थित केला होता.
राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, या योजनेसाठी लेखाशिर्ष २२१७-१३०१ अंतर्गत अर्थसंकल्पीय निधीतून तरतूद करण्यात आली आहे. नमो उद्याने विकसित करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
उद्याने विकसित झाल्यानंतर विभागीय स्तरावर ‘नमो उद्यान’ स्पर्धा आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रशासकीय विभागातून तीन उद्यानांची निवड करण्यात येईल.
- प्रथम पारितोषिक : ₹५ कोटी
- द्वितीय पारितोषिक : ₹३ कोटी
- तृतीय पारितोषिक : ₹२ कोटी
या स्पर्धेचे निकाल १७ सप्टेंबरपर्यंत जाहीर केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.


avanafil generic
March 5, 2026avanafil generic
avanafil generic
sildenafil mechanism in ED
March 5, 2026sildenafil mechanism in ED
sildenafil mechanism in ED