मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्या इंडिया आघाडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जागावाटपांबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचा शरद पवार गट लोकसभेच्या १० ते १२ जागांसाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा आहेत. त्यामुळे यातील जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला २० हून अधिक जागा लढवायच्या आहेत. तर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटही अधिक जागांसाठी आग्रही आहे. दुसरीकडे वंचित बहुजन महाविकास आघाडीसोबत येऊ इच्छित आहे. प्रकाश आंबेडकरांनाही जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे महाआघाडीसमोर मोठा पेच आहे.
दरम्यान लोकसभेत महाराष्ट्रातील या १० ते १२ जागांवर शरद पवार गट आग्रही असल्याची माहिती आहे.
कोणते मतदारसंघ?
बीड, अहमदनगर, हिंगोली, रावेर, जळगाव, सातारा, बारामती, शिरूर, ईशान्य मुंबई, माढा, परभणी, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, नागपूर,