नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चालकाविरहित येणाऱ्या वाहनांबाबत वक्तव्य केलं आहे.
चालकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी चालकविरहित वाहन भारतात येणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, गडकरी म्हणाले की, मी कधीही चालकविरहित वाहनं भारतात येऊ देणार नाही. यामुळे चालक म्हणून काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. आणि तसं मी होऊ देणार नाही.”
नेमकं काय म्हणाले गडकरी?
आयआयएम नागपूरमध्ये आयोजित झिरो माइल संवादादरम्यान देशातील रस्ते सुरक्षासंबंधित चिंता व्यक्त करताना गडकरी म्हणाले की, अपघात कमी करण्यासाठी सरकारी उपाययोजना केल्या जात आहेत. ज्यात कारमध्ये सहा एअरबँग, रस्त्यांवर ब्लॅक स्पॉट कमी करणे आणि इलेक्ट्रिक मोटर्स अधिनियमाच्या माध्यमातून दंड वाढवणे आदी गोष्टींचा समावेश आहे.