X: @therajkaran
मुंबई: लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून (Lok Sabha Election 2024) या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाने देखील राज्यातील 19 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील 19 मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी काँग्रेसने मुंबईत (Mumbai) बोलावली आहे.
या बैठकीत काँग्रेसच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. काँग्रेसकडून (Congress ) घेण्यात येणाऱ्या या विशेष बैठकीत विदर्भातून नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा – गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम या आठ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीत 19 मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. या 19 मतदारसंघात विजयी होण्यासाठी आणखी काय करायला हवं, यासंदर्भात प्रदेश नेतृत्व या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विशेष चर्चा करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, आजी-माजी आमदार तसेच विविध आघाड्यातील जिल्हा पातळीवरील अध्यक्ष यांना या बैठकीत बोलावण्यात आले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) जागांमध्ये 15 जागांवर मतभेद कायम असल्याची माहिती समोर येत आहे. कांग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अजूनही 15 जागांवर सहमती नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 12-12-9 प्रमाणे तिन्ही पक्षांकडून जागावाटप पूर्ण झालं आहे, पण इतर 15 जागांबाबतचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
Also Read: लोकसभेच्या बारामतीसह 13 जागांवर अजित पवारांचा दावा