X: @therajkaran
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे. परंतु असं असतानाच ठाकरे हे आता जुने सहकारी म्हणजेच भाजपासोबत (BJP) पुन्हा युती करणार असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji bapu Patil) यांनी म्हटलं आहे. एक हजार टक्के नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा त्यांनी केला आहे.
शहाजीबापू पाटील यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा अंदाज कधीही चुकणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसंच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षांच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे निवडणुकीतील सर्व्हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेश, राजस्थान त्याचबरोबर बीआरएसचा सर्व्हेदेखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. निवडणूक ही मताला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन करत असल्याचे पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही त्रिमूर्ती 225 च्या वर जागी जिंकणार, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला. संजय राऊत (Sanjay Raut) हा माणूस महाराष्ट्राचा खलनायक आहे, दुर्योधन म्हणून लोक त्यांच्याकडे पाहायला लागली आहेत, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. या जागेचा विषय हा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असं वाटत असतं. परंतु तिन्ही पक्षाचा सन्मान ठेवून जागावाटप होईल, असं शहाजीबापू म्हणाले.
Also Read: चहल, शिंदे यांची बदली करा : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार