नवी दिल्ली
केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सरकारनं जरी कांदा निर्यातील परवानगी दिली असली तरी, त्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीनं परवानगी दिली आहे.
गुजरात-महाराष्ट्रात कांद्याचा पुरेसा साठा
गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता सरकारने ही कांद्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली होती, त्यानंतर झालेल्या कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी
देशात कांद्यासह इतर भाजीपाल्याचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे किंमती घसरल्या आहेत. गुजरातसह महाराष्ट्रात कांद्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे. केंद्र सरकारने 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. तर बांगलादेशातून 50,000 टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.