मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भाजप ही भयग्रस्त झाली आहे, म्हणून…’; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर घणाघात

पुणे

‘काल ११ फेब्रुवारीला देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील आम्ही चारशेहून अधिक जागा जिंकणार, तर ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत आहेत’ असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी आले असताना त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. भाजप ही भयग्रस्त झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार करून लोकांनाही भयग्रस्त करून आपल्याला जिंकता येतंय का? अशी त्यांची खेळी आहे. म्हणून राजकीय नेते, व्यापारी यांच्यावर धाडी सुरू झाल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांना विचारतो की, तुम्हाला हे अपेक्षित आहे का? भीती निर्माण करण्यासाठी धाडी हे यंत्र भाजप वापरत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्र कधीही इतका वादग्रस्त नव्हता. या ठिकाणी स्थिर सरकार होतं. सध्या पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही. तो त्याच्याशी सहमत नाही. त्यामुळे तो निवडणुकीची वाट पाहत आहे, असेही ते म्हणाले.

कुणी सोडून गेल्याने पक्षावर परिणाम होत नाही
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आज राजीनामा सोपवला. यावर प्रतिक्रिया देताना ॲड. आंबेडकर म्हणाले, आमच्या पक्षात मंत्री होते, आमदार होते ते निघून गेले. पण, पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते. मात्र, त्याने पक्षावर काही परिणाम होतो असे मला वाटत नाही. नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशी खाली आहेत, त्यांना ते नाचवणार आहेत. उच्च नेते किंवा त्याखालील नेते यांनाही ते नाचवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली
भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली आहे. आयोगासमोर हा विषय वळवण्याचा प्रयत्न होत होता आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून मी आयोगाला म्हटलं की, मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली आहे. आता मी थांबतो.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात