अयोध्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात दाखल झाले असून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात झाली असून मोदींकडून गर्भगृहात विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी राम मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी गर्भगृहात दाखल झाले असून श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा विधीची सुरुवात झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदी दुपारी १ वाजता सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारी २.१५ च्या सुमारास पंतप्रधान कुबेरटिळा येथील शिवमंदिरालाही भेट देतील. यावेळी राम मंदिर परिसरात बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित आहे. बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कॅफ, विकी कौशल, सोनू निगम यांसारख्या मोठ्या दिग्गज यावेळी उपस्थित आहेत. राम मंदिर सोहळ्यासाठी देशातील मोठे उद्योगपती अंबानी दांम्पत्य दाखल झाले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी दाखल झाल्या आहेत.
लालकृष्ण आडवाणी उपस्थित राहणार नाहीत
उत्तर प्रदेशातील अयोध्येत पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. निमंत्रित दाखल होत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या कार्यक्रमापासून दूर राहू शकतात, अशी शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार अयोध्येतील थंडीची तीव्रता पाहता हा लालकृष्ण अडवाणी येणार नसल्याचे सांगितले जात आहे.