अयोध्येतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारीला प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.यानिमित्ताने राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी घोषित केली असून सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारीच यासंदर्भातील शासन निर्णयही जारी केला.मात्र सोमवारच्या सुट्टीमुळे आज, शनिवारपासून सलग तीन दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त केंद्र सरकारने अर्धा दिवसाची सुट्टी घोषित केली आहे. तसेच विविध भाजपशासित राज्यांनी एक दिवसाची सुट्टी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करण्याची आमदारांनी केली होती.यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी तयार ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या प्रस्तावाला मान्यता दिली. श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिन म्हणून सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.

दरम्यान मध्य प्रदेश, गोवा, उत्तराखंड, छत्तीसगड,आसाम.राजस्थान आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांनी यापूर्वीच २२ जानेवरीला सार्वजानिक सुट्टी जाहीर केली आहे.