मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरणी मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले; संशय वाढल्याचा आरोप

मुंबई/बारामती: राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar died in plane crash) यांच्या विमान अपघाताच्या दिवशीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने (DGCA) माहिती अधिकारांतर्गत देण्यास नकार दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन संजय यादव (RTI activist Nitin Yadav) यांनी केला आहे.

यादव यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ६ ते सकाळी ९ या कालावधीतील मुंबई विमानतळ येथील सीसीटीव्ही फुटेजसाठी (CCTV footage at CSMI airport) १० फेब्रुवारी रोजी आरटीआय अर्ज (RTI application) केला होता. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाने माहिती देण्यास नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे अपघाताबाबत जनतेमध्ये संशय निर्माण होत असून “खरोखरच अपघात झाला की काही घात झाला?” असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा यादव यांनी केला आहे. त्यांनी या निर्णयाविरोधात अपील दाखल केले असून, सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि केंद्रीय माहिती आयोगाच्या (Cetral Information Commissioner) निर्णयांचा संदर्भ देत पुन्हा फुटेजची मागणी केली आहे.

तसेच, त्यांनी आजच मुंबई पोलीस आयुक्तांकडेही (Mumbai Police Commissioner) आरटीआयद्वारे देवगिरी या शासकीय निवासस्थानापासून मंत्रालयापर्यंत २८ जानेवारी रोजी पहाटे ६ ते ९ या वेळेतील वाहतूक पोलिसांकडील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे.

अजित पवार हे घटनात्मक पदावर कार्यरत लोकप्रतिनिधी असल्याने संबंधित फुटेज देण्यास नकार देणे धक्कादायक असल्याचा आरोप करत, त्या दिवसाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सार्वजनिक करावे, अशी मागणी नितीन यादव यांनी केली आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात