बारामती
आताची मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड टाकली आहे.
यापूर्वीही गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या बारामती येथील प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई केल्याचं समोर आलं होतं. यावेळी पाठवलेल्या नोटीसमध्ये ७२ तासांत प्लांट बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
आज सकाळी बारामती अॅग्रोच्या कार्यालयावर सहा ते सात केंद्रीय अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. मात्र ही धाड कोणत्या यंत्रणेमार्फत टाकण्यात आली, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
बातमी अपडेट होत आहे…